मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सत्कार स्वीकारत मेहकर मधून केले प्रस्थान ( व्हिडीओ)

बुलढाणा – अमोल सराफ | समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे एकाच कारने नागपूरहून शिर्डीकडे दौरा सुरू झाला. बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर मेहकर तालुक्यातील फरदापुर फाटा येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

मेहकर येथून प्रस्थान करतांना कारचे स्टेअरिग हे फडणवीस यांच्या हाती  तर शेजारी मुख्यमंत्री शिंदे बसलेले दिसून आले. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. शिर्डीपर्यंतचा मार्ग लवकरच खुला होणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी सकाळीच नागपूर येथे पोहोचले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी एकाच कारने शिर्डीकडे रवाना झाले आहे. फडणवीस यांनी कारची स्टेअरिंग आपल्या हातात घेतली. यावेळी कारमध्ये एकनाथ शिंदे हे शेजारी बसले होते.  कारमधून दोन्ही नेत्यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी करत आहे.

नागपूरहून शिर्डीपर्यंत दोन्ही नेते एकत्र प्रवास करत आहे. विशेष म्हणजे, याआधी जेव्हा एकनाथ शिंदे हे मविआ सरकारमध्ये मंत्री होते, त्यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी केली होती. मर्सिडिज ईलेक्ट्रिक कारने त्यांनी प्रवाास केला होता. त्यावेळी खुद्ध शिंदे यांनी कार चालवली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी दौरा करत आहेत, दरम्यान ते नुकतेच बुलढाण्या जिल्ह्यात दाखल होताच जिल्ह्याच्या सीमेवर मेहकर तालुक्यातील फरदापुर फाटा येथे खा. प्रतापराव जाधव, आ. संजय रायमुलकर यांनी त्यांचे स्वागत केले.  मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेहकर मधून शिर्डी करिता मार्गस्थ झाले आहेत…

 

Protected Content