जळगाव प्रतिनिधी। योगेश ट्रॅव्हल्स् नावाने बनावट वेबसाइड बनवून दिशा बन्सल या महिलेची २७ हजार रूपयात फसवणूक झाल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला आहे. दरम्यान, आपल्या ट्रॅव्हल्स्च्या नावावर बनावट वेबसाइड बनवून कुणीतरी फसवणूक करित असल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शहरातील देशपांडे मार्केट येथे राहुल लक्ष्मण अमृतकर यांचे योगेश ट्रॅव्हल्स् या नावाने व्यवसाय आहे़ अमृतकर यांची डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट योगेशटूरर्स डॉट कॉम अशी अधिकृत वेबसाइड आहे़ परंतू, डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट योगेश ट्रॅव्लस् डॉट कॉम या नावाने कुणीतरी बनावट वेबसाइड बनवून त्यावर लेवा बोर्डींग असा पत्ता दिला आहे़ तर बनावट मोबाईल क्रमांकही बनविण्यात आला असून या क्रमांकावर ग्राहकांनी फोन केल्यानंतर बुकींग चौकशी केली गेली की, एक लिंक पाठविण्यात येते व नंतर खात्यातून पेैसे काढून घेण्याचा प्रकार घडत आहे. त्यातच शहरातील दिशा आशिष बन्सल यांनी देखील त्या क्रमांकावर फोन केल्यानंतर त्यांना लिंक पाठविण्यात आली व त्यांच्या खात्यातून २७ हजार रूपयांची रक्कम काढून घेण्यात आली. दिशा बन्सल यांनी योगेश ट्रॅव्हल्स गाठल्यानंतर त्यांनी बुकींग केल्याचे कळविल्यानंतर त्यावेळी कुठलीही बुकींग झालेली नसल्याचे समजले व तशी कुठलीही वेबसाइड योगेश ट्रॅव्हल्सची नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर दिशा बन्सल यांना आॅनलाइन फसवणूक झाल्याचे समोर आले. तर आपल्या योगेश ट्रॅव्लल्स्च्या नावाने कुणीतरी ग्राहकांची फसवणूक करित असल्याचे कळताच योगेश ट्रॅव्हल्सचे मालक राहुल अमृतकर यांनी त्वरित जळगाव सायबर क्राईम विभाग गाठत पोलिसांना संपूर्ण प्रकार सांगून तक्रार दाखल केली आहे.