विद्यापीठ-उद्योग संवाद शिखर परिषदेचा समारोप

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाच्यावतीने आयोजित विद्यापीठ-उद्योग संवाद शिखर परिषदेचा समारोप एन्डयुरन्स उद्योग समुहाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राम मार्लापल्ले यांच्या मुख्य उपस्थितीत उत्साहात झाला.

७ नोव्हेंबर रोजी एक दिवसाची ही शिखर परिषद विद्यापीठात झाली. ३१० विद्यार्थी, उद्योग प्रतिनिधी व समन्वयक यात सहभागी झाले होते. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे हे समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानी होते. कुलसचिव डॉ. विनोद पाटील, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजेश जवळेकर, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेचे संचालक डॉ. मधुलिका सोनवणे, समन्वयक प्रा. रमेश सरदार, उपसमन्वयक डॉ. उज्ज्वल पाटील यांची उपस्थिती होती.

राम मार्लपल्ले यांनी नोकरी व करिअर याबाबत फरक स्पष्ट केला. यावेळी प्रा. रमेश सरदार यांनी परिषदेचा अहवाल सादर केला. प्रा. जी. ए. उस्मानी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर प्रास्ताविक प्लेसमेंट ऑफिसर सोनाली दायमा यांनी केले. महेश जावळे, कल्पेश अहिरे, यश सोनवणे, प्रथमेश मोरे, सार्थकी देशपांडे या विद्यार्थ्यांनी अभिप्राय व्यक्त केला

Protected Content