मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असणारे अपक्ष आमदार बच्चू कडून यांनी आपल्याला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला असल्याचे आज सांगितले.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या शपथविधीला बच्चू कडू गैरहजर होते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. यावर बच्चू कडू यांनी आज स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, मी माझ्या काही कामानिमित्त बाहेर गेलो होतो. त्यामुळे येवू शकलो नाही. व्यक्तिगत हितासाठी मी कधीही नाराज होणार नाही. पुढील मंत्रिमंडळ विस्तारात तुमच्या नावाचा विचार केला जाईल, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला दिला आहे. त्यामुळे नाराजीचा प्रश्न येत नाही. तर, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना टोला लगावत पक्षनिष्ठा नाही तर जनतेशी निष्ठा महत्त्वाची असते. सामान्य नागरिक, जनतेवर निष्ठा असली पाहिजे, असा असे देखील कडू म्हणाले.
याप्रसंगी बच्चू कडू यांनी नेत्यांना तस्कर दाखवून त्यांचे फोन टॅप करण्यात आले असून आपल्या पीएचा फोन टॅप करण्यात आल्याची माहिती दिली. आपल्याला कोणत्याही अधिकार्याच्या, पक्षाच्या क्लिनचीटची गरज नाही. या प्रकरणात माझी चौकशी झालीच तर काय घडले ते सांगेन असा इशारा देखील त्यांनी दिला.