अमळनेर ते श्री क्षेत्र कपिलेश्वर पायीवारी उत्साहात संपन्न

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील श्री साई गजानन सेवा मंडळाद्वारे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने अमळनेर ते श्रीक्षेत्र कपिलेश्वर पायी वारीचे आयोजन करण्यात आले होते.

 

अमळनेर ते कपिलेश्वर पायी वारी १५  ऑगस्ट  रोजी सकाळी साडेपाच वाजता मोठे बाबा मंदिरावर महापूजा आरती होऊन गण गण गणात बोते।। मंत्र जप करत  वारीचे प्रस्थान करण्यात आले.  मोठेबाबा मंदिर ट्रस्टच्या वतीने वारकऱ्यांना सकाळचा चहा देण्यात आला टाळ मृदंगाच्या गजरात सकाळी वारीचे प्रस्थान झाले वारीत सुमारे २५०  वारकरी सहभागी  झाले होते. ओम नमः शिवाय मंत्र जपत, वारकऱ्यांना मारवाड रस्त्याला श्रीराम मंदिराजवळ जितेंद्र रमेश बोरसे यांनी भाविकांसाठी राजगिरा लाडू चे वाटप केले . वारीचे प्रमुख श्री शिवाजीराव मोहन पाटील व मंडळांनी दिलेल्या सूचनेनुसार शिस्तबद्ध पद्धतीने वारी धार या गावी पोहोचली.  त्या ठिकाणी शशिकांत पाटील , सरपंच सैनदाने यांनी वारकऱ्यांसाठी उपास  चिवडा व केळी प्रसादाचे वाटप केले. वारीप्रमुख शिवाजी मोहन पाटील तसेच विठ्ठल पाटील, शिरीष डहाळे, नामदेव पाटील,  एच.डी. सोनवणे, लक्ष्मण निकम यांचा प्रतिनिधिक स्वरूपात धार ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. पायीवारीत सडावन , चाकवे, धार येथील भाविक सामील झाले होते. पालखीचे सर्व गावात मिरवणूक काढून घरोघरी आरत्या करण्यात आल्या.  एस. एम. आप्पांनी व गुणवंत पवार यांनी मुस्लिम बांधवांचा देखील त्या ठिकाणी सन्मान करत  जातीय सलोखा वाढवण्यासाठी शुभेच्छा दिल्यात.  पुढे, वारी मारवाड गावी भैरवनाथ मंदिरावर पोहोचली.  मंदिरात वारक ऱ्यानी  ओम नमः शिवायचा जप केला.  या ठिकाणी मुकेश साळुंखे व सुनील मुंदडे यांनी वारकऱ्यांसाठी साबुदाणा खिचडी फराळाचे व्यवस्था केलेली होती. या  ठिकाणी देखील वारी प्रमुखांसह मंडळाचे पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.  गोवर्धन संस्थांचे अध्यक्ष निंबा पाटील, सुनील मुंदडे व मुकेश साळुंखे यांचा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला.  रस्त्यावर गोवर्धन गावी नरेंद्र पाटील,  न्हानभाऊ यांनी चहाची व्यवस्था ग्रामस्थ यांनी केली होती.  वारकऱ्यांना  कळमसरे शिवजवळ किशोर चौधरी यांनी चक्की पाकीटचे वाटप करण्यात आले.  कळमसरे गावाजवळ वारी पोहोचतात अनेक महिला भगिनींनी पूजेसाठी पुढे येऊन पूजा केली.  पुढे ओम नमः शिवाय चा जयघोष करत पालखी हायस्कूलच्या प्रारंगात दाखल झाली.  याठिकाणी पिंटू राजपूत यांनी वारकऱ्यांसाठी केळी प्रसाद व उपास चिवडा फराळ म्हणून दिला.  तर भिकेसिंग जतन सिंग राजपूत यांनी राजगिरा लाडू चे वाटप केले.  सेवा देणारे भाविक यांचा वारी प्रमुखांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आरती होऊन वारकरी पालखीघेऊन नाचत आनंद घेत वाजत गाजत  निघाले. पुढे सडावणकर नामदेव बापू यांनी वारकऱ्यांना खजूर पाकीट वाटप केले.  विरार मुंबईहून राकेश खास करून वारीसाठी दाखल झालेले होते. निम गावी छोटु गयभु पाटील यांनी चहा पान सेवा दिली .वारीत सुमारे ७५  ते ८०  महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या.  वारी कपिलेश्वर तीर्थाजवळ पोहोचल्यानंतर गुरुवर्य महेश महाराज, मगन भाऊसाहेब हे वारीस मानवंदना देण्यासाठी पुढे आलेत.  वारीप्रमुख  एस. एम. आप्पा  यांना पुढे करत वारी श्री क्षेत्र कपिलेश्वर येथे पोहोचले. तेथे भजन सेवा सत्संग करण्यात आला. त्या ठिकाणी कपिलेश्वर संस्थांच्या वतीने वारीप्रमुख शिवाजीराव मोहनराव पाटील यांना श्रीफळ  देऊन सत्कार के.ला त्यासोबत शाल श्रीफळ देऊन  महामंडलेश्वर हंसानंदाजी तीर्थराज महाराज व ट्रस्टचे सी. एस. पाटील , मगन भाऊसाहेब, यांच्या हस्ते त्यांना मिळालेला जीवनगौरव पुरस्कारसाठी सन्मानित करून, महाराजांनी शुभेच्छा दिल्या.  वारीत सहभागी वारकऱ्यांना ग्रामस्थ ब्राह्मने यांनी महाप्रसादाचे वाटप  केले.   वारीत धार , मारवड, कळमसरे, सडावन, नेरपाट, चाकवे येथील महिलांना ग्रुप नुसार सन्मानित करण्यात आले. वारीत सहभागी पुरुष वारकऱ्याना    सन्मानित करण्यात आलं. गणेश भामरे बाम्हणेकर यांना मंडळाचे वतीने सन्मानित करण्यात आले. नागाई अकव्वा विनोद लांडगे यांनी पाणी जार सेवा उपलब्ध केली. सरपंच उमेश साळुंखे  व राजु फाफोरेकर यांनी पाणी गाडी सेवा दिली. सडावण येथिल नामदेव बापू, गुलाब मुरलीधर पाटील, चाकवे येथील सुखदेव पाटील ,पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अंकुश पाटील,  समाधान पाटील शनि महाराज, तुळशीराम व्यंकट पाटील, ईश्वर पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. श्री साई गजानन मंडळाचे विठ्ठल पाटील, रमेश सैंदाणे, लक्ष्मण निकम, एस. डी. सोनवणे ,डहाळे सर, रमेश विठ्ठल पाटील, दिलीप खैरनार ,योगेश बाग, आर. एच. पाटील, वाल्मिक मराठे, राजेंद्र सोनवणे, सुरेश धनगर ,कांतीलाल पाटील, मुकेश साळुंखे, चेतन पाटील ,गणेश बोडरे, डी. ई. पाटील यांनी परिश्रम घेतले. सर्वांचे मंडळाचे अध्यक्ष एस. एम. पाटील व विठ्ठल पाटील. डहाळे सर यांनी आभार मानले.

Protected Content