बंद असलेल्या हॅण्डपंपांची त्वरित दुरुस्ती करा : नागरिकांची मागणी

 

पारोळा, प्रतिनिधी । शहरातील विविध भागातील हॅन्डपम्प मागील दोन ते तीन महिन्यापासुन बंद पडलेले असून त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सॅनिटायझेशन व वारंवार हात स्वच्छ धुण्याचे आवाहन करण्यात येत आहे. हात स्वच्छ धुण्यासाठी लागणारे पाणीचा नळाद्वारे नगरपालिका पुरवठा मात्र १० दिवसाआड करत आहे. यावर उपाय म्हणजे नगरपालिकेने दर ३ ते ४ दिवसांनी पाणीपुरवठा करावा किंवा मागील २ ते ३ महिन्यांपासून शहरातील नगरपालिकेच्या मालकीचे ३५ ते ४० हॅन्डपंप बंद अवस्थेत आहेत त्यांना दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी नागरिक करीत आहे. हॅन्डपंपाचे पाणी कपडे, धूनी, गुरांना पानी, भांडे व इतर घरगुती कामांना हॅन्डपंपाचे पाणी नेहमीच वापरण्यात कामात येते. परंतु, आता उन्हाचा पारा चढला आहे. नगरपालिका पाणी देते ते पुरत नाही. हॅन्डपंपाची दुरूस्ती केली तर नागरिकांना चोवीस तास हॅन्डपंपाचे पाणी मिळते. हॅन्डपम्पच्या पाण्याचा वापर गुरांना पाणी, कपडे, भांडी धुण्यासाठी होत असतो. कडक उन्हाळा असल्यामुळे कुलरसाठी नागरिकांना सहज पाणी मिळते. नगरसेवकांनी हॅन्डपंपाचे दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला असल्याने शहरातील अनेक हॅन्डपंपाचे पाणी कधीच आटत नाही. परिसरातील झोपडपट्टीतील अनेक नागरीक हॅन्डपंपाचे पाणी पिण्यासाठी वापरतात. नगराध्यक्ष करण पाटील व मुख्याधिकारी डाॅ. विजयकुमार मुंडे व सर्व नगरसेवक व नगरसेविका यांनी शहरातील हॅन्डपंप सुरू करून द्यावेत. जेणे करून येणारा कडक उन्हाळ्यात देखिल नागरिकांनी पाणी मिळेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

Protected Content