अयोध्येतील राममंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर शेंदूर्णी येथे शांतता समितीची बैठक

शेंदूर्णी, प्रतिनिधी । उद्या बुधवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी उत्तरप्रदेशातील आयोध्या येथील श्रीराम मंदिर भूमिपूजन आयोजित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शेंदुर्णी येथे पोलिस विभागातर्फे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

गावातील विश्व हिंदू परिषद संघटनेचे पदाधिकारी, बजरंग दल संघटनेचे पदाधिकारी तसेच शेंदुर्णी नगरपंचायत येथील नगरसेवक व गावातील जेष्ठ हिंदू मुस्लिम नागरिक बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत उद्या होत असलेल्या अयोध्या येथील श्री राम मंदिर भूमिपूजन अनुषंगाने कोणतीही सामुहिक पूजा, सामूहिक दिवे लावणे तसेच कोणतीही मिरवणूक काढुन मिरवणुकीत घोषणा बाजी करून इतर समाजाचे मन दुखावले जाणार नाही याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच सदर सूचनेचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल अशा पहुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, सहाय्यक उप पोलिस निरीक्षक किरण बर्गे यांनी सूचना दिल्या. व कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आवाहन करण्यात आले यावेळी पो.ना.किरण शिंपी, प्रशांत विरणारे, गजानन ढाकणे उपस्थित होते.

Protected Content