बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकडची चोरी

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रायपूर कुसुंबा येथे तरुणाचे बंद घर फोडून घरातून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण ४२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात बुधवार १४ जून रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, महेश नाना सोनार (वय-३८, रा.रायपूर कुसुंबा ता. जळगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. ७ जून सायंकाळी ६ ते १४ जून सकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान महेश सोनार यांचे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने व रोकड असा एकूण ४२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी बुधवार १४ जून रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुदस्सर काजी करीत आहे.

Protected Content