मुंबई (वृत्तसंस्था) राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आरोप करण्यापेक्षा तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करा, अशी मागणी करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.
फडणवीस मुख्यमंत्री असतांना विधानसभा निवडणुकीच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह दोन्ही काँग्रेसच्या काही नेत्यांचे फोन व विशेषत: व्हॉट्सअॅप मेसेज टॅप केल्याचा आरोप होत आहे. फोन टॅपिंग ही विकृती असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. तर, फोन टॅपिंगची माहिती भाजपच्याच एका ज्येष्ठ मंत्र्याने मला दिली होती, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.