फैजपुर, प्रतिनिधी | संविधान बचाव देश बचाव सीएए, एनपीआर,एनआरसी रद्द करण्यासाठी आज फैजपूर येथे संविधान बचाव कृती समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जवळपास आठ हजार नागरिकांनी सहभाग घेतला.
आज शुक्रवार १७ जानेवारी रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत फैजपूर येथील कै. लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी क्रीडा संकुलात संविधान बचाव कृती समितीतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी नागरिकत्व दुरूस्ती कायदा(सीएए,एनपीआर,एनआरसी) केंद्र शासनाने त्वरीत रद्द करावा या मागणीसाठी धरणे आंदोलनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हाजी अब्दुल रऊफ जनाब, अशोक भालेराव, डॉ. अब्दुल जलील, भिम आर्मी प्रदेश प्रवक्ता रमाकांत तायडे (जोजो), अॅड. खालिद शेख, मौलाना ताहेर पटेल, हाफिज इकबाल, हाफिज अनस, हाफिज वसीम, असगर सैय्यद शेख सादिक शेख हसन, कालु मिस्तरी, अजमत शेख मुनाफ, चंद्रकला इंगळे, रेखा मेढे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. दरम्यान यावेळी संविधान जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, भारत जिंदाबाद या घोषणांनी तब्बल दोन तास धरणे आंदोलन स्थळ दणाणून निघाले होते. तिरंगा ध्वज व लहान मुलांच्या हातात भारताचे थोर पुरुषांच्या असलेल्या प्रतिमा यावेळी आकर्षण ठरले. याधरणे आंदोलनप्रसंगी महिला, पुरुष, वृद्ध व लहान बालक यासह असंख्य नागरिक उपस्थिती होते. यावलचे नायब तहसिलदार राहुल सोनवणे यांनी निवेदने स्वीकारले. याधरणे आंदोलनाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, भीम आर्मी सेना प्रदेश प्रवक्ता रमाकांत तायडे(जोजो), यांनी पाठींबा दिला. यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक शेख जफर, काँग्रेस गटनेता कलिम खां मण्यार, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता शेख कुर्बान, उपनगराध्यक्ष रशीद तडवी,शेख जलील हाजी अब्दुल सत्तार,शेख इरफान, काँग्रेस शहर अध्यक्ष शेख रियाज, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष अनवर खाटीक, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष वसीम जनाब, आसिफ मॅकनिकल,शेख रईस मोमीन, शाबाजखान, याकूबखान, हाजी फिरोज शेख इब्राहिम,सलीम खान उस्मान खान, मुदस्सर नजर, डॉ. इमरान शेख, शेख कामिल, सईद मिस्तरी यांच्यासह संविधान बचाव कृती समिती यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मलक आबीद यांनी केले.