फैजपूर येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे रक्तदान शिबीर

 

फैजपूर, प्रतिनिधी । जळगाव जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे  फैजपुर येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटील यांच्या नेतृत्वात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.

कोरोनामुळे राज्यभरात आरोग्य यंत्रणेवर भलामोठा ताण पडलेला आहे. राज्यातील अनेक रक्तपेढ्यांमधील रक्तसाठा अतिशय कमी आहे. म्हणून इतर रुग्णांची रक्ताअभावी होणारी हेळसांड थांबावी यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या व युवक प्रदेशाध्यक्ष महेबूबभाई शेख, कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, कार्याध्यक्ष रवीकांत वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातील पक्षाचे सर्व पदाधिकारी व् कार्यकर्ते यांना ठिकठिकाणी रक्तदान शिबिर आयोजन करुण रक्तदान केलेल्या आवाहनानुसार रक्तदान शिबीर घेण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन  माजी आमदार  मनिष जैन,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.  प्रमुख पाहुणे म्हणून महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी, राष्ट्रवादी काँग्रेस शहरअध्यक्ष अनवर खाटीक, तेजस पाटील, मोहसीन तडवी, सागर चौधरी,  सचिन कोळी, बंटी आंबेकर, गौरव महाजन, रोहन महाजन यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीर घेण्यात आले.

रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी फैजपुर युवकचे शहराध्यक्ष विनोद कोल्हे तसेच अनेक राष्ट्रवादी युवक चे कार्यकर्ते उपस्थित होते.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व असंख्य कार्यकर्त्यांनी तसेच सर्वसामान्य नागरिकांनीही रक्तदान करत या मोहिमेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

Protected Content