फैजपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या अध्यक्षपदी दिपक हिवरे

फैजपूर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त उत्सव समिती गठन करण्यात आली आहे. सम्राट बुद्ध विहारात आयोजित बैठकीत उत्सव समितीच्या अध्यक्षपदी दिपक हिवरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या अध्यक्षपदी दिपक हिवरे यांच्यासह कार्यकारणीची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. कार्यकारणी पुढील प्रमाणे उपाध्यक्ष सागर भालेराव, सचिव देवानंद मेढे, कार्याध्यक्ष शे. जहांगीर, खजिनदार रोहित मेढे, सल्लागार मयुर मेढे, तसेच सदस्यपदी उदय तायडे, पवन मेढे, किरण मेढे (बग्गनभाऊ), कुणाल मेढे, चेतन गाढे, आर्यन केदारे, राजु वाघ, चेतन मेढे, चंद्रमनी मेढे, रोहित मेढे, बाळा मेढे, अतुल मेढे, अनिकेत साळुंके, सुमित मेढे यांचा समावेश आहे. बैठकीला यावल तालुका युवक कांग्रेसचे सरचिटणीस अजय मेढे, भिमपुत्र ग्रुपचे अध्यक्ष पप्पु मेढे, अनिल मुरलीधर मेढे, फाईट क्लबचे गोल्डन मेढे, योगराज मेढे, सामाजिक कार्यकर्ते कैलास भोजराज मेढे, मुन्ना मेढे, प्रविण मेढे यांची उपस्थित होती.

Protected Content