फैजपूर प्रतिनिधी । येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीने राज्यातील महाविद्यालये व विद्यापीठे यामध्ये पुकारलेल्या लेखणी बंद अवजार बंद व ठिय्या आंदोलनात महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्वरित सातवा वेतन आयोग लागू करणे, तसेच आश्वासीत प्रगती योजनेचा 12 व 24 वष पदोन्नतिचा लाभ शासन निर्णय ७ डिसेंबर २०१८ने पूवलक्षी प्रभावाने रद्द केला आहे तो पूनजिवीत करून सेवांतर्गत आश्वासित 10, 20 आणि 30 वर्ष सेवा नंतरची तीन लाभाची योजना लवकरात लवकर लागू कराव्यात अशा रास्त मागण्यांसाठी कर्मचारी लेखणी बंद अवजार बंद व ठिय्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. तशा आशयाचे पत्र स्थानिक शिक्षकेतर कर्मचारी कार्यकारिणी अध्यक्ष श्री आर आर जोगी व इतर पदाधिकारी यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांच्याकडे सुपूर्द केले आहे. या आंदोलनात एन मूक्टो स्थानिक शाखेने सुद्धा पाठिंबा दर्शवला असून पाठिंब्याचे पत्र स्थानिक शाखा अध्यक्ष डॉ दीपक सूर्यवंशी यांनी कार्यकारणी पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहे.
या आंदोलनात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून लवकरच सकारात्मक निर्णय घेतले जातील असा आशावाद व्यक्त केला. यावेळी शिक्षकेतर कर्मचारी कार्यकारणी अध्यक्ष- आर,आर,जोगी, उपाध्यक्ष – आर, वाय, तायडे, सचिव – पवन अजलसोडे, खजिनदार – ललित पाटील यांच्या सोबत डी एच चव्हाण, व्ही एस सिसोदे, सिद्धार्थ तायडे, सी एस फिरके, गुलाब वाघोदे, डि.के.तायडे, एच.एस.तडवी, प्रमोद अजलसोडे, गोपाळ देवकर, गणेश चव्हाण, आदी कर्मचारी उपस्थित होते.