फैजपूर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | टिपू सुलतान यांच्या २७२ वी जयंती निमित्त आज दि २० नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता फैजपूर येथील म्युनिसिपल हायस्कूल च्या प्रांगणावर विराट कुस्त्या उत्साहात संपन्न झाल्या.
या कुस्त्यांच्या विराट आम दंगल प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पी आर पी चे जगन सोनवणे,सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे,सावदा येथील डायमंड इंग्लिश मिडीयम स्कूलचे चेअरमन हारून शेठ,फैजपूर चे माजी नगरसेवक शेख जफर,माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान, माजी उपनगराध्यक्ष कलिम खान मण्यार,शेख इलियास सर,तडवी,सैय्यद जाविद जनाब,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अनवर खाटीक, अरमान तडवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.विजयी झालेल्या मल्ल पहेलवान यांना रोख बक्षिसे देण्यात आली.विशेष म्हणजे या कुस्त्यांच्या दंगल मध्ये खंडवा येथील महिला पहेलवान युवतीने सहभाग नोंदवून विजय मिळवला.यावेळी प्रेक्षकांनी मोठया प्रमाणावर हजेरी लावली होती.
या विराट कुस्त्यांचे आयोजन शेख अखतर पहेलवान, शेख वसीम जनाब,शेख फारूक अब्दुल्ला, आवेश भांजा यांनी केले होते.यावेळी पहेलवान शेख नासिर हुसेन हाजी करीम,शेख शकील पहेलवान,उत्तम पहेलवान, सबदर पहेलवान हे पंच म्हणून काम पाहिले.तर फैजपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगांवकर, पोलिसउपनिरीक्षक मकसुद्दीन शेख यांच्यासह पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.