फैजपूर प्रतिनिधी । येथील स्वामीनारायण गुरुकल संस्थेकडून १ लाख ११ हजार १११ रुपये कोरोना ग्रस्तांसाठी पंतप्रधान सहाय्यता निधीला दिली आहे. प्रांत डॉ. अजित थोरबोले यांना आज धनादेश सुपूर्द केला.
यावेळी सावदा स्वामीनारायण गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष शास्त्री भक्तीप्रकासदासजी यांनी देशाप्रती प्रेम, आपुलकी, बंधुभावभाव असून कोरोना या संकटावर मात करण्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून स्वामीनारायण गुरुकल संस्थेकडून १ लाख ११ हजार १११ रुपये देणगी देण्यात आली. समाजातील सेवाभावी नागरिकांनी सढळ हाताने पंतप्रधान सहाय्यता निधी व मुख्यमंत्री सहायता निधीला दान देऊन सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. देशावर कोरोना महामारीचे संकट आले आहे ते पूर्ण नष्ट व्हावे यासाठी देवाकडे आपण सर्वांनी साकडे घालावे. तसेच नागरिकांनी घरी राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ही शास्त्री भक्तीप्रकाशदासजी यांनी केले आहे.