फैजपूर : प्रतिनिधी । शहरातील पुरातन जागृत देवस्थान म्हणून धोबी वाड्यातील मोठा मारुती मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिरात मंगळवारी हनुमान जन्मोत्सव भाविकांनी साजरा केला
या मंदिरातील मूर्तीला सकाळी सहा वाजता जल, दूध अभिषेक पूजन व आरती माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक भाजपा गटनेते मिलिंद वाघुळदे यांचे हस्ते करण्यात आली . पुरोहित नंदू महाराज, दिनेश जोशी यांनी विधिवत पूजन केले. त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला.
कोरोना नियमाचे पालन करून साध्या पद्धतीने गर्दी न करता, मास्कचा वापर करून असंख्य भाविक या सोहळ्यात सहभागी झाले होते . कोरोना महामारी नष्ट व्हावी. जनजीवन सुरळीत सुरु रहावे , सर्वाजण सुखी समाधानी रहावे अशी प्रार्थना माजी नगराध्यक्ष वाघुळदे यांनी केली. यावेळी रमेश गलवाडे, विलास काठोके, रणजित राजपूत, कैलास चौधरी, संजू धोबी,धोंडू सोनवणे, विवेक चौधरी, शिवा रावते आदी उपस्थित होते.