मूळ मुक्ताई मंदिराचे रखडलेले बांधकाम १५ दिवसांत मार्गी लागणार : आ. चंद्रकांत पाटील

मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आदिशक्ती मुक्ताबाई अंतर्धान समाधीस्थळ कोथळी येथील मुळमंदिराचे दहा महिन्यांपासून रखडलेले बांधकाम पंधरा दिवसांत मार्गी लावणार असल्याची माहिती आज आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली. महाशिवरात्रीनिमित्त चांगदेव-मुक्ताबाई यांची महापूजा व अभिषेकानंतर ते बोलत होते.

आज भल्या पहाटे आ. चंद्रकांत पाटील यांनी तापी पयोष्णी संगमावर योगीराज चांगदेव महाराज यांची महापुजा केली.संत मुक्ताबाई संस्थान कोथळी-मुक्ताईनगर मानकरी भैय्यासाहेब रविंद्र पाटील यांनी दुग्धाभिषेक व पंचामृत पुजा आरती केली.त्यावेळी पंजाबराव पाटील,अंकूश चौधरी,पंकज कोळी, पुरूषोत्तम वंजारी,विशाल सापधरे हजर होते. तेथून मुळ मुक्ताबाई समाधीस्थळ कोथळी येथे सौ.यामीनीताई व आ.चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक आई मुक्ताई महाअभिषेक पूजन करून आरती केली.

यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित वारकर्‍यांशी संवाद साधला . राज्यात आधी संतांचे संस्थेचे, महापुरुषांच्या शताब्दी महोत्सव वर्ष साजरे केले तेथे सरकारने विशेष पॅकेज देवून कामे केली.मात्र यंदा आई मुक्ताबाई सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात निधीअभावी १० महीन्यापासून बांधकाम बंद पडले आहे. निदान येत्या २५मे पर्यंत तरी पुर्ण व्हावे अशी रास्त अपेक्षा वारकर्‍यांनी व्यक्त केली. यावर आमदार पाटील यांनी पंधरा दिवसात हे काम मार्गी लावण्याची ग्वाही दिली.

यावेळी मंदिर व्यवस्थापक उद्धव महाराज जुनारे, विश्वंभर महाराज तीजारे, ज्ञानेश्वर गावंडे, लक्ष्मण सावळे, रतिराम शास्त्री, बळीराम चोपडे, अमोल महाराज, भावराव महाराज लखन महाराज पाटील पुरूषोत्तम वंजारी आदी उपस्थित होते.

Protected Content