Home Cities यावल फैजपुरात आ. गोपीचंद पडळकर यांचा निषेध

फैजपुरात आ. गोपीचंद पडळकर यांचा निषेध

0
43

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । शरद पवार यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. याबाबतचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असे बेताल वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर याने केल्या प्रकरणी आज फैजपुर राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतिने जाहिर निषेध केला असून हे निवेदन पोलिस स्टेशन ठाणे अंमलदार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस चे नःपा गटनेता शेख कुर्बान हाजी करीम फैजपुर राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अनवर खाटीक, उपनगराध्यक्ष रशिद तडवी, प्रवक्ता शेख शाकिर, सामाजिक न्याय शहराध्यक्ष अशोक भालेराव, युवराज गाढे, देविदास साळुंखे हे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound