सांगवी येथे जागेच्या वादातून परस्परांविरूध्द गुन्हे दाखल

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या सांगवी येथे जागेच्या वादातून परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले असून यात दरोडा व अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

याबाबत जमराबाई बाबू तडवी ( वय ६५ ,रा . सांगवी ) यांनी पहूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २०जून रोजी सकाळी ९ मी किशोर किसन पाटील यांच्या शेतात मजुरी करण्यासाठी गेले होते. तेव्हा घर पाडत असल्याचा निरोप माझ्या नातूकडून समजले. मी व माझा मुलगा दिलीप बाबू तडवी आम्ही माझ्या घराकडे गेली असता जेसीबीच्या साह्याने घर पाडत असल्याचे दिसले. जेसीबी चालकाला मी विचारले असता त्याने म्हटले की, किशोर पाटील यांच्या सांगितल्यावरून मी भिंत पाडत आहे. इतक्यात तिथे किशोर पाटील आल्यावर त्यांनी आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी यांच्या फिर्यादीवरून किशोर किसनराव पाटील यांच्याविरुद्ध भादंवी ४२७, ५०४, ५०६ , ३ / १ आर . एस – (२) प्रमाणे अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

दरम्यान किशोर किसनराव पाटील (वय ५० रा. सांगवी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ,दिलीप बाबू तडवी, राजु जमन तडवी, जब्बार शब्बीर तडवी, सलीम जब्बार तडवी व जमराबाई बाबू तडवी (रा.सर्व सांगवी ) यांनी माझी ४० हजार रुपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन तोडून चोरून पळून घेऊन गेले . या प्रकरणी वरील सर्व आरोपींविरुद्ध भादंवी ३९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी करीत आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्‍वर कातकडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी, पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे यांनी भेट देऊन पाहणी केली.

Protected Content