फैजपुरला कोरोनाचा संशयित; जिल्हा रूग्णालयात रवानगी

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथे आज कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या संशयातून एका रूग्णाला आज जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सध्या कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून २१ दिवसांचा लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. यासाठी प्रशासन सज्ज असून जनताही आता संचारबंदीला सरावल्याचे दिसून येत आहे. जळगावातल्या मेहरूण भागात एक रूग्ण पॉझिटीव्ह आढळल्यामुळे लोक थोडी जास्त काळजी घेऊ लागले आहेत. यातच आज येथील एका रूग्णाला कोरोनाच्या संशयातून जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधीत रूग्ण हा काही दिवसांपूर्वीच सूरत येथून आला होता. गत तीन दिवसांपासून त्याला ताप असून काही लक्षणे ही कोरोनाच्या संसर्गासारखी दिसत असल्याने त्याला जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले असून तेथे त्याची चाचणी घेण्यात येणार आहे.

Protected Content