जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आरवी एंटरटेनमेंट्स तर्फे इंडियाज फॅशन लीग 2022 व आरवी आयकॉनिक अचिव्हर्स अवॉर्ड 2022 मुंबईच्या पंचतारांकित हॉटेल मध्ये आयोजित करण्यात आले होते. याचे आयोजन जळगाव येथील दाम्पत्य संस्थापक रूपा शास्त्री आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय शास्त्री यांनी केले होते.
याबाबत संस्थापक रूपा शास्त्री आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय शास्त्री यांनी सागितले की, आरवी एंटरटेनमेंट्सद्वारा मुंबई येथे आयोजित कार्यक्रमास श्रेयस तळपदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुरस्कार विजेत्यांमध्ये अलंकृत सहाय, पायल घोष, निकिता रावल, चाहत खन्ना, राखी सावंत, डॉल्फिन दुबे, राजीव अडातिया, वेरोनिका वनीज, धृती सहारन, अँजेला क्रिसलिंझकी, हिमानी भाटिया, अलंकृत सहाय, लुवेना लोध, केनिशा अवस्थी, चिंकी मिंकी, राजीव अदातिया, निकिता रावल, मेलविन लुईस, राखी सावंत, रितेश सिंह, रोशनी कपूर, खुशी गुप्ता आणि अनेक बॉलिवूड मधील नावाजलेले प्रसिद्ध कलाकार उपस्थित होते. सेलिब्रिटी अँकर सिमरन आहुजाने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याकार्यक्रमात जळगांव, धुळे, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक येथूनच नव्हे तर दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद व छत्तीसगड येथून सुद्धा मॉडेल्स आणि डिझायनर्स यांनी सहभाग घेतला.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/483898709806811