फुले मार्केट परिसरातून महिलेच्या पर्समधून रोकड व दागिने लांबविले

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील फुले मार्केट परिसरात खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून पाच ग्रॅम सोन्याचे दागिने व २० हजार ९०० रुपयांची रोकड चोरून येण्याचे समोर आले आहे. या संदर्भात मंगळवार ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललिताबाई पितांबर राठोड (वय-५५) रा. कासमवाडी, जळगाव ह्या आपल्या कुटुंबीयांसह राहतात. मंगळवार ४ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता त्या बाजार खरेदी करण्यासाठी शहरात आले होते. जळगाव शहरातील फुले मार्केट परिसरात असलेल्या साजन सजनी दुकानाच्या बाजूला उभ्या असताना चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून २० हजार ९०० रुपयांची रोकड सोन्याचे दागिने व इतर सामानाची चोरून नेले. या संदर्भात त्यांनी सायंकाळी ६ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश बोरसे करत आहे.

Protected Content