औद्योगिक वसाहत परिसरातील गुनीना कंपनी समोरून मिनी ट्रक लांबविला

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | औद्योगिक वसाहत परिसरातील गुनीना कमर्शियल लिमिटेड कंपनीच्या बाहेर लावलेली २ लाख रुपये किमतीची मिनी ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडलेला आहे. या संदर्भात मंगळवार ४ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दिलीप वामन जाधव (वय ६३) रा. पाथरी ता. जि. जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांच्या मालकीचा मिनी ट्रक क्रमांक (एमएच ०४ एजी। ४८०) ही 407 गाडी रविवारी २ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ७ वाजता औद्योगिक वसाहत परिसरातील गुनिना कमर्शियल लिमिटेड या कंपनीच्या बाहेर पार्किंगला लावली होती. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी २ लाख रुपये किमतीचा मिनी ट्रक हा चोरून नेल्याचे सोमवारी ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता उघडतील आले. ट्रक मालक दिलीप जाधव यांनी ट्रॅकचा सर्वत्र शोध घेतला. परंतु त्यांना त्यांचे वाहन कुठेही मिळाले नाही, अखेर मंगळवार ४ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन मुंडे करीत आहे लावलेला होता.

Protected Content