भुसावळ, प्रतिनिधी । काही दिवसांपूर्वी नाहाटा कॉलेजच्या बीसीएच्या विद्यार्थ्यांनी नाहाटा कॉलेजचे प्राचार्य यांना ही अतिरिक्त फी वाढीच्या संदर्भात चर्चा केली होती. मात्र, त्यांनी विद्यार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने मनसे जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी प्राचार्यांची भेट घेऊन फी वाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला.
नाहाटा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मनसे जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांच्याकडे शैक्षणिक शुल्कातबाबतची आपली समस्या मांडली असता अढळकर यांनी नहाटा कॉलेज येथे प्राचार्यांशी चर्चा केली. तरी प्राचार्या मीनाक्षी वायकुळे यांनी विद्यापीठ व आमचे मॅनेजमेंट यांच्याशी चर्चा करून लायब्ररीची फी ६२५० रुपये असून त्याचा विद्यार्थ्यांना कोणताही उपयोग होत नसल्याने ती पूर्णपणे कमी करण्यात करू. ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली आहे त्यांची फीपण परत करण्यात येईल असे तोंडी आश्वासन दिले. याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष चेतन अढळकरयांच्या सोबत भुसावळ शहराध्यक्ष विनोद पाठक, किशोर नन्नवरे, प्रतिक भंगाळे , बीसीएचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. भविष्यात हा फी वाढ निर्णय मागे न घेतल्यास विद्यार्थ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.