महामार्गावर ट्रकचालकांना लुटणारी टोळीचा पर्दाफाश

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील लोणारी मंगल कार्यालयासमोरून जाणाऱ्या ट्रकला अडवून लुट व दरोडा टाकण्याच्या इराद्याने आलेल्या पाच जणांना भुसावळ शहर पोलीसांनी अटक केली आहे.

अधिक माहिती अशी की, १६ जानेवारी रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी गस्तवर असतांना शहरातील लोणारी मंगलकार्यालयाच्या समोरील मोकळ्या जागेत पोलीसांनी काही जणांच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. पोलीसांनी वाहन थांबविले असता त्यावेळी पुलीस आई रे भागो असा आवाज करत हवेत गोळीबार केला. त्यावेळी गस्तवर असलेले पोलीस कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल भुषण चौधरी आणि पो.कॉ. समाधान पाटील यांनी संशयित आरोपी राकेश उर्फ डीडी राजू बारे (वय-२०) आणि भुषण उर्फ टक्या यशवंत मोरे (वय-२०) दोन्ही रा. हुडको कॉलनी यांना ताब्यात घेतले. तर इतर तीन ते चार जण पळाले. मध्यरात्री उशीरा पोलीस कर्मचारी यांनी फरार झालेले संशयित आरोपी विलसन ॲलेकझांडर जोसेफ (वय-२७), सागर आनंदा पारधे (वय-३०), ऑस्टीन शरद रामटेके (वय-२१) सर्व रा. हुडको कॉलनी, भुसावळ यांना अटक केली.

त्यांची अधिक चौकशी केली असता पाचही जण महामार्गावरील ट्रकला अडवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या इरादा होता. तसचे दरोडा टाकणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. पाचही संशयित आरोपींकडून ९ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोहेकॉ इकबाल अली इब्राहिम अली सैय्यद यांच्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Protected Content