जळगाव : वृत्तसंस्था । दिवाळी मुहुर्तावर फिनोलेक्स पाइप्स आणि फिनोलेक्स कम्पनीचे कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी भागीदार पुण्याचे मुकुल माधव फाऊंडेशनमार्फत “गिव विथ डिग्निटी ऊपक्रम राबवन्यात आला. जळगाव जिल्ह्यात या उपक्रमा अंतर्गत 800 कुटुंबांना मोफत किराणा किट वाटप करण्यात आले.
या अत्यंत स्तुत्य ऊपक्रमा अंतर्गत भारतातील 24 राज्यामधे 70 हजार कुटुंबांना मोफत किराणा किट वाटप करण्यात आले. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी झेंडा दाखवून या उपक्रमाची सुरवात केली.
चार जणांच्या कुटुंबाला 21 दिवस पुरेल इतके साहित्य देण्यात आले. अल्प उतन्न गटातील लोक आणि वैश्विक कोरोना महामारीने त्रस्त झालेल्या लोकांना मोफत किराणा किट वाटप करण्यात आले.या योजनेत प्रामुख्याने शेतकरी, छोटे व लघु , गृहउद्योग यांच्याकडुन धान्य आणि वस्तु खरेदी करून, एक किट तयार करून गरजु व विस्थापित व्यक्ति व कुटुंबाना मोफत दिले गेले.
अल्प उत्पन्न गटातील लोक व महामारिने बेकार झालेले लोक यांचे जीवन तसेच दिवाळी सन सुकर होण्याच्या दृष्टिकोणातुन हा उपक्रम राबवला गेला
फिनिलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनचे हे किराणा किट जळगाव शहरातील 7 नगरामधे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ -जनकल्याण समिती सेवा विभाग यांच्या मदतीने वाटप करण्यात आले .जळगाव शहरात 13 आणि 14 नोव्हेम्बरला 300 किराणा किट वाटप करण्यात आले पाचोरा आणि भडगांव तालुक्यात 10 ,11,व 12 तारखेला 500 किट वाटप करण्यात आले.
पाचोरा येथे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किशोर आप्पा , बोहरा पाइप्स आणि इले मोटर चे मालक मुर्तुज़ा बोहरा , आधारवड सामाजिक संस्था आणि बोहरा ट्रस्ट चे पदाधिकारी उपस्तित होते.
भड़गांव येथे खासदार उन्मेष पाटील आणि श्रीपाद एजेंसीचे मालक निरंजन पाटील उपस्थित होते. या उपक्रमात कंपनीचे विक्री अधिकारी विशाल काकाणे (जळगाव) आणि श्रीनिवास वराडे (धुळे) यांनी काम पाहिले.