फडणवीस संतापले ; अधिकाराचे हनन होत असल्याचा आरोप

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झालेले पहायला मिळत आहे.विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका करत सभागृहातून बाहेर पडण्याचा इशारा दिला.

 

यावेळी गदारोळ घालणाऱ्या सदस्याकडे पाहून ‘ए काय रे…’असं म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखालीच विधीमंडळाचं कामकाज चालवलं जात आहे.

 

“आम्हाला संधी देतो असं तुम्ही सांगू शकता. पण तुम्ही पाहतच नाही. सुधीर मुनगंटीवार ज्येष्ठ सदस्य आहेत. ते मगापासून बोलण्यासाठी उभे आहेत पण तुम्ही त्यांच्याकडे पाहतच नाही. आमच्या अधिकाराचं हनन होत असेल आणि असं रेटून घ्यायचं असेल तर कशाला बसवता. पाठवा ना बाहेर,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी सत्ताधारी पक्षातील आमदारांना गदारोळ सुरु केला असता फडणवीसांनी त्यांच्याकडे पाहून ए काय रे असा उल्लेख करताच अजून गदारोळ सुरु झाला.

 

पुढे  म्हणाले की, “सभागृहात कसं वागायचं हे शिकवा यांना…आपण विरोधी पक्षाकडे लक्ष दिलं पाहिजे. आम्ही उभे आहोत, आमचा हक्क आहे. आमच्या अधिकारांचं हनन होणार असेल तर आम्ही एक मिनिटं बसणार नाही”.

Protected Content