जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या हस्ते म.गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी यावेळी सुंदर अशी भाषणे केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना म.गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.