जळगाव प्रतिनिधी । येथील रहिवासी श्रीमती नलिनी विश्वासराव गरुड (मूळ रा. शेंदुर्णी, ता. जामनेर) यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृध्दापकाळाने आज शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या शनिवार, दि. २८ सप्टेंबर १९ रोजी दुपारी २ वा. गट नं ३०, प्लॉट नं ४९, हनुमान मंदिराच्यामागे, मुक्ताईनगर, जळगाव येथील राहत्या घरुन नेरी नाका येथे निघेल. त्यांच्या पश्चात २ मुले, ३ मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार होता. त्या दूध फेडरेशन मधील निवृत्त कर्मचारी अनिल गरुड आणि नूतन मराठा महाविद्यालया तील सेवानिवृत्त प्राध्यापक प्रा. सुनिल गरुड यांच्या मातोश्री होत.
प्रा. सुनिल गरुड यांना मातृशोक
5 years ago
No Comments