पहुर येथील जि.प.शाळेत पाककला कृती स्पर्धा उत्साहात

पहुर प्रतिनिधी । येथील संतोषीमातानगर प्राथमिक शाळेत पहूर केंद्रातर्फे पाककला कृती स्पर्धा २६ रोजी घेण्यात आली.शालेय पोषण आहार अभियान अंतर्गत पाककला कृती स्पर्धेचे आयोजन पहूर केंद्राचे केंद्रप्रमुख भानुदास तायडे यांनी केले होते.

सदर स्पर्धेत पहूर केंद्रातील लोंढरी खुर्द , पहूरपेठ कन्या, पहूरपेठ बॉईज, संतोषीमातानगर पहूरपेठ, पहूर कसबे कन्या, पहूर कसबे बॉईज, लेलेनगर पहूर कसबे, आर.बी.आर.कन्या पहूर , डॉ. हेडगेवार व सावित्रीबाई फुले विद्यालय, पहूर कसबे या शाळेतील स्वंयपाकी व मदतनीस यांनी सहभाग घेतला. यास्पर्धेत बाजरी व नाचणीपासून पदार्थ बनविणे हा विषय देण्यात आला होता.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाळधी केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख सुरेश तेली हे होते. तर व्यासपिठावर पहूर केंद्राचे केंद्रप्रमुख भानुदास तायडे, मुख्याध्यापक पी.टी. पाटील, सुधीर महाजन, सुनंदा साळुंखे, गिरीष भामेरे आदी उपस्थित होते. यावेळी सुरेश तेली यांनी प्रथम क्रमांक १५१, द्वितीय क्रमांक १३१, तृतीय क्रमांक १११ रुपयांच्या बक्षिसांची रक्कम देण्यात आली. तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकास पहूर केंद्रातर्फे प्रमाणपत्र व सहभागी शाळांना उतेजनार्थ प्रमाणपत्र शिक्षण परिषदेत देण्यात येणार असल्याचे भानुदास तायडे यांनी प्रास्ताविक करतांना उपस्थित स्पर्धकांना सांगितले. पाककला कृती स्पर्धेचे आयोजन करून यशस्वीपणे राबविल्याबद्दल प्राथ. शिक्षणाधिकारी देवांग श्री. साहेब, सर्व तालुका शा.पो.आ अधिक्षक,तसेच ए.बी.वाडकर, गटशिक्षणाधिकारी पं.स.जामनेर, व्ही.व्ही काळे, शा.पो.आ. अधिक्षक पं स.जामनेर,
व्ही.डी.सरोदे, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या कडुन सर्वांचे अभिनंदन होत आहे.

सुत्रसंचालन पी.टी.पाटील यांनी केले व आभार पंडीत बावस्कर यांनी मानले. परिक्षक म्हणून श्रीमती विसपुते, उपशिक्षिका आर.टी.लेले हायस्कुल यांनी काम पाहिले.

विजयी स्पर्धक पुढील प्रमाणे
सविता शिवराम साबणे, डॉ.हेडगेवार व सावित्रीबाई फुले विद्यालय पहूर कसबे (प्रथम क्रमांक), ललिता माधव उबाळे व शैलेजा विजय सुरडकर, जि.प.प्राथमिक शाळा संतोषी मातानगर, पहूरपेठ(द्वितीय क्रमांक), रत्नाबाई चिंधु चौधरी व पल्लवी चिंधु चौधरी, जि.प.शाळा लेलेनगर, पहूर कसबे (तृतीय क्रमांक)

पाककला कृती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शंकर भामेरे सर , पंडीत बावस्कर ,सुनील कोळी ,श्रीकांत पाटील ,अजय देशमुख ,दिनेश गाडे ,श्रीमती चित्रलेखा राजपुत ,मनिषा राऊत ,सुवर्णा मोरे इत्यादीनी परिश्रम घेतले.

Protected Content