Home Cities धरणगाव शेतरस्त्यांच्या बाबतीत गुलाबराव पाटील धडधडीत खोटं बोलताय : पी.सी.पाटील

शेतरस्त्यांच्या बाबतीत गुलाबराव पाटील धडधडीत खोटं बोलताय : पी.सी.पाटील

0
62

pc patil

जळगाव प्रतिनिधी | शिवसेना-भाजपा युती होणार की नाही? यावर अजून शिक्कामोर्तब झालेले नाही. परंतू तत्पूर्वीच जळगाव ग्रामीण मतदार संघात वाद उफाळून आला आहे. पाळधी येथे भाजपचा उधळून लावण्याचा झालेला प्रयत्न आणि त्यानंतर झालेले आरोप-प्रत्यारोप. तसेच राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आजच्या मेळाव्यात भाजपा नेते पी.सी.पाटील यांना आपल्या विरुद्ध निवडणूक लढण्याचे दिलेले आव्हान, या सगळ्या पार्श्वभूमीवर पी.सी.आबांनी ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी कुठेही शेतरस्ते झालेले नसतांना ना.पाटील साफ खोटं बोलून जनतेची दिशाभूल करत असल्याचा खळबळजनक आरोप लावला. एवढेच नव्हे, तर कोणत्या गावात त्यांनी किती शेतरस्ते बनविले,हे सिद्ध करून दाखविण्याचे प्रतिआव्हान तसेच या मुलाखतीत त्यांनी ना.पाटील यांच्यावर अनेक गंभीर आरोपही लावले.

 


Protected Content

Play sound