Home आरोग्य प्रसिद्ध गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण ; पार्टीत १२५ जणांच्या संपर्कात

प्रसिद्ध गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण ; पार्टीत १२५ जणांच्या संपर्कात

0
44


लखनऊ (वृत्तसंस्था) बॉलिवूडची प्रसिद्ध पार्श्वगायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. चिंताजनक म्हणजे कनिकाने लंडनहून परतल्यानंतर एक पार्टी दिली होती आणि पार्टीत बॉलीवूड सेलिब्रेटीसह तब्बल १२५ जण सहभागी झाले होते. आता त्या सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे.

 

इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत कनिका म्हणाली की, मी भारतात परतल्यानंतर विमानतळावर नार्मल प्रोसिजरद्वारे १० दिवसांपूर्वी माझी स्कॅनिंग केली होती. ४ दिवसांपूर्वी माझ्या लक्षणे दिसून आली. मागील चार दिवसांपासून मला फ्लू होता. मी तपासणी केली. कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. मी आणि माझे संपूर्ण कुटुंब क्वारंटाइन झाले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांची मॅपिंग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, कनिकाने रविवारी १५ मार्चला लखनऊ येथील शालिमार गॅलंट अपार्टमेंटमध्ये एका पार्टीचे आयोजन केले होते. यामध्ये लखनऊचे अनेक बडे अधिकारी आणि नेते मंडळीसह बॉलीवूड सेलिब्रेटी देखील सहभागी झाले होते. या पार्टीमध्ये एकूण १२५ जण सहभागी झाल्याची माहिती समोर आली आहे. आता या सर्व लोकांची माहिती घेतली जात असून सर्वांची तपासणी केली जात आहे.


Protected Content

Play sound