प्रशांत किशोर ठरविणार शिवसेनेची निवडणूक रणनीती?

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी आज शिवसेनेच्या खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीत एक विशेष उपस्थिती होती ती म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यशात मोलाची भूमिका बजावणारे राजकीय पंडित आणि जेडीयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांची. या बैठकीत किशोर यांनी शिवसेनेच्या खासदारांना मार्गदर्शनही केल्याचे सुत्रांकडून कळते. त्यामुळे शिवसेना-भाजपा युतीसाठी प्रयत्न करण्याबरोबरच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची प्रचार रणनिती ठरवण्याची जबाबदारी किशोर यांच्यावर सोपवण्यात आल्याची, चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

‘मातोश्री’वर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत प्रशांत किशोर यांनी महत्त्वाची चर्चा केली. त्यानंतर शिवसेना नेते, खासदार आणि युवासेना कार्यकारिणीसोबत त्यांची महत्त्वाची बैठक झाली. बैठकीत शिवसेनेच्या लोकसभा निवडणूक प्रचार रणनीतीवर महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीत हेमंत गोडसे, गजानन कीर्तिकर, शिवाजी आढळराव पाटील, चंद्रकांत खैरै, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, अनंत गीते, संजय राऊत, श्रीकांत शिंदे यांच्यासोबत रामदास कदम, संजय राठोड, निलम गोऱ्हेही उपस्थित होते.

किशोर यांची केवळ सदिच्छा भेट असल्याने ते शिवसेनेची प्रचार रणनिती सांभाळणार असल्याची चर्चा केवळ माध्यमांमध्येच आहे, त्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. उद्धव ठाकरे प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला सक्षम आहेत. हळू हळू आपल्याला सर्वकाही कळेल असे सांगत मात्र, त्यांनी या चर्चेच्या शंकेला वावही दिला आहे. शिवसेना कायमच मोठा भाऊ राहिला आणि यापुढे राहणार असल्याचा पुनरुच्चार राऊत यांनी पुन्हा एकदा केला आहे. राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रातील जनता ठरवेल तर देशाचा पंतप्रधान मात्र, शिवसेनाच ठरवेल असा विश्वास त्यांनी यावेली व्यक्त केला. त्याचबरोबर अण्णा हजारेंच्या उपोषणाबाबत बोलताना राऊत म्हणाले, अण्णांना भेटण्यापेक्षा त्यांच्यामागे आम्ही ताकद उभी करु, ते काम उद्धव ठाकरे करीत आहेत

Add Comment

Protected Content