प्रभु श्रीरामाच्या चरित्राचे आचरण करण्याची गरज – जनार्दन हरीजी महाराज

faijpur news 1

फैजपूर, प्रतिनिधी | श्रीविष्णूचा पूर्ण अवतार पुरूषोत्तम श्रीरामप्रभु यांच्या जीवन चरित्रातील प्रत्येक प्रसंग आणि घटना आपल्याला आदर्श जीवन जगण्याबाबत मार्गदर्शन करतात. त्यामुळे प्रभु श्रीरामाच्या चरित्राचे आचरण करण्याची गरज आहे. त्यांच्या चरित्राचे आचरण केल्यास संस्कारांची रूजवण होईल, असे प्रतिपादन महामंडलेश्‍वर आचार्य श्रीजनार्दन हरीजी महाराज यांनी तालुक्यातील बामणोद येथे केले.

 

बामणोद येथील प्रभाकर दौलत झोपे यांच्या पंचाहत्तरीनिमित्त सुरू असलेल्या श्रीमद् दशावतार कथेत ते बोलत होते. महाजन पुरी येथे श्रीविष्णूच्या १० अवतारांच्या कथांचे कथन महामंडलेश्‍वर आपल्या अमृतमय वाणीतून संपन्न झाले. भगवंतांच्या अवतारांचे वर्णन करतांना कथा सांगता सांगता आधुनिक जीवनाला त्याची जोड देऊन जीवन कसे जगावे, याचेही त्यांनी मार्गदर्शन करत केले. कथेदरम्यान प्रभु श्रीरामाचे चरित्र सांगतांना केवटभेटीचा, शबरीची बोरे खाण्याचा प्रसंग सजीव साकारण्यात आला. ते म्हणाले की, आमची भारतीय संस्कृती पुरातन काळाची असून तिने आम्हांला समृद्ध असा इतिहास दिला आहे. आपण मात्र अंधानुकरणाने तिला विसरून इतरांचे अनुकरण करतो आहोत. आपल्या देशाला सन्मार्गाकडून घेऊन जाण्यासाठी संस्कारांची गरज आहे आणि हे संस्कार प्रभु श्रीराम यांच्या चरित्रातून शिकायला मिळत असल्याने सर्वांनी श्रीरामाच्या चरित्रातून शिकायला हवे, असेही त्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर श्री निष्कलंकी भगवान अवतार जन्माचा सजीव देखावा देखील सादर करण्यात आला. आज सायंकाळी दिंडी व महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे.

Protected Content