मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी प्रफुल प्रभाकर यमनरे हा तृतीय वर्ष विज्ञान या वर्गात शिकत असून याची सर्वप्रथम दिनांक २१ व २२ सप्टेंबर, २०२२ रोजी एन.एस.एस. आर. डी. परेड साठी कवयित्री बहिणाबाई चौधरी-उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संघात निवड झाली होती.
त्यानंतर दिनांक २८ ते ३० सप्टेंबर, २०२२ या कालावधीत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे निवड चाचणीत यशस्वी होऊन महाराष्ट्र संघासाठी निवड झाली. दिनांक १९ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२२ या दरम्यान सरदार वल्लभाई पटेल विद्यापीठ,आनंद (गुजरात) येथे महाराष्ट्र संघातून पश्चिम विभाग निवड चाचणीसाठी जाणाऱ आहे. प्रफुल एमनेरे हा रणथंब गावचा रहिवासी असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात राहून श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयात आपले शिक्षण पूर्ण करीत आहे.
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे व मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या सन्माननीय अध्यक्षा ॲड. रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी विशेष अभिनंदन करून २६ जानेवारी २०२३ रोजी नवी दिल्ली येथे संपन्न होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनासाठी प्रफुलची निवड होईल अशी आशा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे आदरणीय सचिव डॉ. सी.एस. चौधरी, उपाध्यक्ष नारायण चौधरी व संचालक पुरुषोत्तम महाजन यांच्या हस्ते प्रफुल यमनेरे याचा जाहीर सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. हेमंत महाजन, उपप्राचार्य डॉ.अनिल पाटील तसेच प्राध्यापक बंधू व भगिनी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. विजय डांगे यांनी केले. तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन प्रा. डॉ. दीपक बावस्कर व प्रा. डॉ. ताहीरा मीर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एन.एस.एस. विदयार्थीनी सपना वंजारी हिने केले.