प्रधानमंत्री पिकविमा योजनेत सहभागासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र शासनाने खरिप हंगाम 2020 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना भारती ॲक्सा जनरल इंन्शुरन्स कं. लि. मुबंई यांच्या सहकार्याने जळगाव जिल्हयात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत 31 जुलै, 2020 पर्यंत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकर यांनी केले आहे.

अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणा-या शेतक-यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार व तसेच बिगर कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक आहे. जे कर्जदार शेतकरी स्वत:च्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होणेबाबत घोषणापत्र देणार नाहीत, त्या सर्व शेतक-यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल.
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरिप हंगाम 2020 मध्ये राबवण्यिात येत आहे. योजनेंतर्गत समाविष्ट पिके, विमा संरक्षित रक्कम व शेतक-यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता तपशील खालीलप्रमाणे.

खरिप ज्वारी- विमा संरक्षित रक्कम 24 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 480 रुपये,
बाजरी- विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 400 रुपये,
सोयाबीन- विमा संरक्षित रक्कम 36 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 720 रुपये,
भुईमुग- विमा संरक्षित रक्कम 32 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 640 रुपये,
तीळ- विमा संरक्षित रक्कम 22 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 440 रुपये,
मुग- विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 400 रुपये,
उडिद- विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 400 रुपये,
तुर- विमा संरक्षित रक्कम 25 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 500 रुपये,
कापुस- विमा संरक्षित रक्कम 40 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 2 हजार रुपये,
मका- विमा संरक्षित रक्कम 26 हजार 200 रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 524 रुपये इतका असून
शेतक-यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरिप हंगामासाठी व इतर पिकांसाठी 2 टक्के व कापूस पिकासाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.

या योजनेच्या लाभासाठी संपर्काचे ठिकाण-

आपल्या तालुक्यातील नजीकच्या जिल्हा बँक शाखा, सर्व राष्ट्रीयकृत बॅक, तालुका कृषि अधिकारी कार्यालय (सर्व तालुके), उपविभागीय कृषि अधिकारी, जळगाव, पाचोरा, अंमळनेर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव आकाशवाणी शेजारी, प्रशासकीय इमारत, दुरध्वनी क्र. 0257-2239054/2236708, भारती ॲक्सा जनरल इंन्शुरन्स कं. लि. मुबंई टोल फ्री क्रमांक 1800 103 2292, श्री. गजानन पाटील, मोबाईल क्रमांक- 8087305060, जिल्हा व्यवस्थापक, सामान्य सुविधा केंद्र, (सी.एस.सी केंद्र) जळगाव येथे संपर्क साधून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगाव संभाजी ठाकूर, यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content