प्रथमिक सोयीसुविधा न दिल्यास महिलांकडून मोर्चा आणण्याचा इशारा

 

चाळीसगाव, प्रतिनिधी ।शहरातील  मराठा मंगल कार्यालयाजवळील, दाळवाले खळे परिसर प्रभाग क्रमांक १२ हा समस्यांचे माहेरघर बनला असून हा  या समस्या तत्काळ सोडविण्यात  याव्यात अशा मागणीचे निवेदन मुख्याधिकार्‍यांना  देण्यात आले.

शहरात असलेल्या प्रभाग क्रमांक १२ मधील दाळवाले खळे परिसरात आजपर्यंत कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सोयीसुविधांचा लाभ या परिसरातील नागरिकांना झालेला नाही.  रस्ता कॉंक्रिटीकरण परिसरात केले गेले नसल्याने सम्पूर्ण परिसरात खड्डेच खड्डे  झालेले आहेत. त्याचप्रमाणे अद्ययावत गटारीच नसल्याने  डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने साथीचे आजार परिसरात उद्भवत आहेत. त्याचबरोबर परिसरात पेव्हर ब्लॉक बसवावेत, एलईडी लावण्यात यावे, हातपंप दुरुस्त व्हावा तसेच ओपन स्पेस सुध्दा विकसित करण्यात यावा अशी सुध्दा मागणी महिलांनी यावेळी चाळीसगाव नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.  पंधरा दिवसांत जर विकास कामे सुरू झाली नाहीत तर पुन्हा मोठ्या संख्येने महिलांचा मोर्चा नगरपालिकेवर आणण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.

 

निवेदन हे लोकविकास बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष योगेश अशोक मोरे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. या निवेदनावर  उषा सुभाष कासार, वैशाली संतोष पाटील , कुसुम अशोक मोरे,  सकुबाई कल्याण सिंग गांगुर्डे, शोभा विलास कासार ,मंगलबाई यशवंतराव देशमुख, सौ सुरेखा अच्युतराव देशमुख,  मंगलबाई बापू चौधरी,  मनीषा राहुल कासार,ज्‍योतीबाई राजेंद्र महाले, पूजा भिकन भालेराव, मिनाबाई मधुकर सोनार, मीना संजय पाटील, प्रमिला चंद्रकांत येवले, सीमा मनोहर शहापूरकर, सुरेखा राजेंद्र अमृतकार,भारती शंकर सोनार ,कमलबाई मदनलाल परदेशी, मिराबाई मदनलाल राणा, वच्‍छलाबाई लक्ष्मण कासार, प्रमोद तुकाराम पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

 

Protected Content