चोपडा, प्रतिनिधी । चोपडा एज्युकेशन सोसायटी चोपडा संचलित प्रताप विद्या मंदिरात १ ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिओमीटच्या माध्यमातून ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले.
जिओमीटच्या माध्यमातून ऑनलाईन व्याख्यानाचे प्रमुख व्याख्याते प्राध्यापक शिवाजी पाटील यांनी थेट नाशिकहुन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. लोकमान्य टिळक आणि इतर राष्ट्र पुरुषांना डोक्यावर न घेता, डोक्यात घ्या. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर मार्गक्रमण करून आदर्श जीवन जगणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन त्यांनी केले. यात सर्व विभागातील विद्यार्थी व शिक्षक बंधू-भगिनी यांनी सहभाग घेतला. यावेळी प्रदीप कोळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरेल पोवाडा सादर करीत कार्यक्रमाचा प्रारंभ केला. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक डी व्ही याज्ञीक यांनी केले. तर सूत्रसंचालन तुषार लोहार यांनी व आभार ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य जे. एस. शेलार यांनी केले. ऑनलाइन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य जे . एस . शेलार, बी. ए. पाठक, नितीन पाटील , आर. पी. पाटील या तंत्रस्नेही शिक्षकांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात संस्थेचे सचिव माधुरीताई मयूर यांनी देखील ऑनलाईन उपस्थिती दिली. तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक डी व्ही याज्ञीक, उपमुख्याध्यापक आर आर शिंदे, पर्यवेक्षक जी वाय वाणी, आर बी पाटील तसेच संस्थेचे समन्वयक गोविंदभाई गुजराथी आदी उपस्थित होते.