शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीचा डी फार्मसीचा 100 तर बी फार्मसीचा 96 टक्के निकाल

एरंडोल, प्रतिनिधी । तालुक्यातील पळासदड येथील शास्त्री फौंडेशन संचालित शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मधील 2019-20 डी. फार्मसी चा निकाल 100 टक्के व बी.फार्मसी या अभ्यासक्रमांच्या परीक्षेचा निकाल 96 टक्के लागला आहे.

डॉ. बाबासाहेब तंत्रशास्त्र विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या बी. फार्मसीच्या प्रथम वर्ष मधील द्वितीय सत्र चा निकाल लागला असून संस्थेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. शैलजा माळी हिने 8.79 ग्रेड (CGPA) सह प्रथम क्रमांक मिळवला असून, सचिन शिंपी 8.57 ग्रेड (CGPA) सह द्वितीय व निकिता दांडे 8.53 ग्रेड (CGPA) सह तृतीय क्रमांक मिळाला आहे. तसेच संस्थेतील इतर 54 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच डी. फार्मसी प्रथम वर्षाचा निकाल लागला असून 48 विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले आहे. नेहा सोनवणे (89.82%) व रोहित वाणी (89.82%) यांनी संयुक्त पणे प्रथम क्रमांक मिळवला असून कु. विजया धनगर (88.64%)हिने द्वितीय व सागर पाटील (87.46%)याने तृतीय क्रमांक मिळवला आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशा बद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विजय शास्त्री, सचिव रूपा शास्त्री, प्रा. गोपीचंद भोई (उप. प्राचार्य), प्रा. जावेद शेख, प्रा. किरण पाटील, प्रा.अमृता चिंचोले, प्रा. हितेश कापडने, प्रा. राहुल बोरसे, प्रा. महेश पाटील, जनसंपर्क अधिकारी शेखर बुंदेले सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. सदरील यशासाठी प्रा. डॉ. शास्त्री यांनी सर्व प्राध्यापकांचे अभिनंदन केले व प्राध्यापकांच्या केलेल्या मेहनतीमुळेच विद्यार्थ्यांचा निकाल एवढा चांगला लागला असे त्यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या यशासाठी संस्थेतील सर्व शिक्षकवृंद यांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

Protected Content