अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील प्रताप महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यपीठांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महाविदयालयाच्या परिसरातील ५० किलो प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आले.
प्लास्टिक कचरा संकलन करून नगरपालिकेस जमा करण्यात आला. या अभियानास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर. शिरोडे यांनी मार्गदर्शन केले. रासेयो संचालक डॉ. सचिन नांद्रे, जिल्हा समनव्यक डॉ. मनीष करंजे व विभागीय समनव्यक डॉ.संजय शिंगाणे यांनी प्रेरणा दिली. यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.अवित पाटील व महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.भाग्यश्री जाधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी स्वयंसेवक सागर कोळी, विदयार्थी प्रतिनिधी अमोल पाटील, अस्मिता बैसाने यांनी मेहनत घेतली.