प्रताप नगरातून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रताप नगर परिसरात राहणाऱ्या तरुणाची दुचाकी अज्ञात चोरट्याने मध्यरात्री चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.  याबाबत मंगळवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सागर राजेंद्र देवरे (वय-३६) रा. प्रताप नगर जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. एलआयसी एजंट म्हणून नोकरीला आहे. सोमवार १३ मार्च रोजी सायंकाळी त्यांनी त्यांच्या घरासमोर दुचाकी (एमएच १९ डीई ६३२९) ही पार्किंग करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. हा प्रकार मंगळवार १४ मार्च रोजी सकाळी ८ वाजता समोर आला. त्यांनी परिसरात दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर सायंकाळी ५ वाजता त्यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक बापुराव बडगुजर करीत आहे.

Protected Content