जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त जळगाव येथे पोलीस बँड पथकाचे संगीतमय सादरीकरण करून रेझिंग डे सप्ताहाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक, एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आले.
तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला २ जानेवारी १९६१ साली ध्वज प्रदान केला, तोच दिवस महाराष्ट्र पोलिस दलाचा स्थापना दिन म्हणून ओळखला जातो. यानिमित्ताने 2 जानेवारी २०२३ जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस ‘स्थापना दिवस (रेझिंग डे)’ साजरा होत असून जळगावकरांसाठी महात्मा गांधी उद्यान जळगाव येथे पोलीस बँड पथकाचे संगीतमय सादरीकरण करून रेझिंग डे सप्ताहाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक, एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित नागरिकांनी पोलीस बँड पथकाचे संगीताला भरभरून दाद दिली.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उप अधीक्षक संदीप गावित, पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, विजय ठाकूरवाड, दिलीप भागवत, रामकृष्ण कुंभार, जयपाल हिरे, राखीव पोलीस निरीक्षक सोनावणे, शांती दूत सेनेचे अधिकारी अमलदार, प्रतिष्ठित नागरीक, तसेच इतर अधिकारी अमलदार हे उपस्थित होते.