चित्रा चौकातील ट्रेडर्स दुकान फोडून मुद्देमाल लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील चित्रा चौकातील शर्मा बिल्डिंगमधील जय लहरी ट्रेडर्स दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातून ७२ हजार ९०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले. याबाबत सोमवारी २ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हेमंत नंदलाल रंगलानी (वय-५०) रा. साने गुरुजी कॉलनीच्या मागे, टेलीफोन नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे चित्रा चौकातील शर्मा बिल्डिंग येथे जय लहरी ट्रेडर्स नावाचे शेतीला लागणारे इलेक्ट्रिक मोटार यांचे दुकान आहे. दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता ते दुकान बंद करून घरी गेले होते. त्यानंतर रविवारी दुकान बंद होते. सोमवारी २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या दुकानावर काम करणारा कामगार सुरेश फेगळे यांनी फोन करून दुकानात चोरी झाल्याचे सांगितले. चोरी झाल्याची माहिती पडल्यानंतर हेमंत रंगलानी यांनी दुकानावर धाव घेऊन पाहणी केली. यामध्ये अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्याचे दिसून आले. हेमंत रंगलाणी यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता मध्यरात्री ३.३० वाजेच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती शटरचे कुलूप तोडून दोन इलेक्ट्रिक मोटर व इतर सामान असा एकूण ७२ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून आल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी हेमंत रंगलानी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सोमवारी २ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content