दहीगाव येथील तत्कालीन ग्रामसेवकाच्या निलंबनासाठी प्रहार अपंग क्रांती आक्रमक(व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील दहिवद ग्रामपंचायतीच्या दिव्यांग निधीत गैरव्यवहार झाला असून तत्कालीन ग्रामसेवकास तत्काळ निलंबित करण्यात यावी अशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलनतर्फे जिल्हा परिषद येथे थाळीनाद आंदोलन करून करण्यात आली.

 

ग्रा.पं. दहिवद येथील दिव्यांग ५% निधी बाबत तक्रार करून चौकशी करण्याची मागणी करण्यात आला होती. या चौकशी दरम्यान तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतीमध्ये अनियमितता केल्या प्रकरणी प्रशासकीय कारवाईस पात्र असल्याचा अहवाल अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी तक्रारकर्ते यांना दिला होता. या प्रकरणी संबंधित ग्रामसेवकाची निलंबनाची मागणी करण्यात आली होती. तथापी गटविकास अधिकारी यांना निलंबनाचे अधिकार असतानाही त्यांचे निलंबन न करता कारवाईचा अहवाल त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.पं.(ग्रापं.विभाग) जळगाव यांच्याकडे पाठविला होता. यावरून निलंबनाची कारवाई ही तात्काळ करण्यात येईल असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले होते. मात्र, २ महिने उलटून ही कोणतीही कारवाई करण्यत न आल्याने जिल्हा परिषद येथे थाळीनाद आंदोलन करून संबधित ग्रामसेवकास तत्काळ निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात उपाध्यक्ष जितेंद्र चुनीलाल पाटील योगेश पवार, प्रदीप सोनवणे, योगेश पाटील, इस्माईल इब्राहीम खाटिक, कैलास बेलदार, नितीन बडगुजर, मधुकर पाटील, भाऊसाहेब पाटील, भाऊसाहेब पाटील, मच्छिंद्र पाटील, प्रकाश पाटील, शांताराम पाटील आदी सहभागी झाले होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/5132428863505450

 

Protected Content