पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये आर्धी फी माफ करा; पालकांची मागणी (व्हिडीओ)

भुसावळ, प्रतिनिधी । येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलतर्फे कोरोना काळात शैक्षणिक फीची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.  या कोरोना काळात फीची रक्कम  भरणे पालकांना अवघड जात असून वार्षिक फी कमी करण्यात यावी अशी मागणी पालकांनी प्राचार्यांना निवेदनाद्वारे केली आहे. 

निवेदनाचा आशय असा की, आज दि. १ मार्च रोजी पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये  सर्व पालकांनी जून २०२०च्या फीबाबतचे निवेदन प्राचार्यांना दिले. यावेळी प्राचार्यांनी शाळेची फी ही हफ्त्यांमध्ये भरावी लागेल असे सांगितले. कोरोना २०२० काळात शाळांनी कोणत्याही प्रकारची फी आकारू नये असा शासनाचा नियम आहे. असे असून सुद्धा शाळेत ऑनलाईन क्लासची फी अदा करण्याचे सांगण्यात येत आहे. तर ही फी किती घेणार आहात व पुढील वर्षी किती फी अकारणात आहात याची लेखी स्वरुपात माहित द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पूर्ण फी न घेता निम्मी फी आकारण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे. निवेदनावर पी. के. गुप्ता, यु. एन. पाटील, आर. के. शर्मा, सी. डी. टाडा आदी पालकांच्या स्वाक्षरी आहे.   

https://www.facebook.com/508992935887325/videos/135880565007083

 

Protected Content