जळगाव प्रतिनिधी । नानाजी देशमुख कृषी संजीवनी म्हणजेच ‘पोकरा’ योजनेत जीएसटी बिले सादर केलेल्या शेतकर्यांना ही देयके तातडीने अदा करण्याची मागणी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ही जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून सुरु झालेली आहे. शेतकर्यांना विविध घटकांसाठी पूर्व संमती मिळाल्याने त्यांनी जी.एस.टी. बिले सादर केली आहेत. या अंतर्गत शेती पंप, विहीर, ड्रीप, स्प्रिंक्लर, त्याच बरोबर काही ठिकाणी मूल्य आधारित ग्रीन हाउस, शेड हाउस, पॅक हाउस अश्या विविध औजारे घटकांचा त्यामध्ये समावेश आहे. अनुदान मिळण्यासाठी जीएसटी बिलांची आवश्यकता असल्याने शेतकर्यांनी व्याजाने, उसनवारीने पैसे उभारून त्या सर्वांची खरेदी करून जी.एस.टी. बिले दाखल केली आहेत. ही खाजगी देणी असल्याने या योजनेतंर्गत लाखो शेतकर्यांची शासनाकडून येणे आजही थकीत आहे. यामुळे या शेतकर्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. अश्या लाखो शेतकर्यांच्या अनुदानाची रक्कम ही त्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करण्याचे आदेश द्यावेत जेणेकरून यातून लाखो शेतकर्यांना याचा फायदा होईल. राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून आपण बळीराजाची आर्थिक अडचण दूर करण्यासाठी तात्काळ आदेश द्यावेत अशी आग्रही मागणी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राच्या माध्यमातून केली आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००