पैसे घेतल्याच्या संशयावरू तरूणाला काठीने मारहाण; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । रिक्षातील पैसे घेतल्याच्या संशयातून जानकी नगरातील तरूणाला रिक्षाचालकाने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, सोनु बन्सीलाल चौधरी (वय-२८) रा. पापड गल्ली, जानकी नगर हा मजूरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतो. २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता नेरी नाका येथे कामानिमित्त गेला होता. त्यावेळी त्याचा रिक्षाचालक मित्र सुभाष कोळी हा भेटला. त्यानंतर काम आटोपून चौधरी पेट्रोलपंपाजवळ असलेल्या ओट्यावर बसला असता त्याठिकाणी रिक्षाचालक सुभाष कोळी हा तिथे आल्यानंतर माझ्या रिक्षातील ५५० रूपये का घेतले या कारणावरून शिवीगाळ करू लागला. आपण पैसे घेतले नसल्याचे सोनू चौधरी याने सांगताच रिक्षा चालक कोळी याने रिक्षातील काठी काढून बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. यात सोनू चौधरी हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुभाष कोळी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे. 

Protected Content