एरंडोल -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील पातरखेडा येथील विवाहितेला घटस्फोटाची धमकी देत माहेरहून घरजमीन घेण्यासाठी पैसे आणावे, यासाठी शिवीगाळ व मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवार २२ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता एरंडोल पोलीस ठाण्यात पतीसह सासरकडील १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील पातरखेडा येथील माहेर असलेल्या स्वाती दिनेश पाटील (वय-२१) यांचा विवाह धुळे जिल्ह्यातील मोहाडी येथील दिनेश मोतीलाल पाटील यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे काही दिवस गेल्यानंतर विवाहितेला घर जमीन घेण्यासाठी माहेरहून पैसांची मागणी केली. दरम्यान, विवाहितेने माहेरहून पैसे आणले नाही म्हणून विवाहितेला घरात घुसू देणार नाही व घटस्फोट देण्याची धमकी दिली. त्याचप्रमाणे सासरच्या मंडळींनी देखील पैशांचा तगादा लावला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. याप्रकरणी विवाहितेने एरंडोल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती दिनेश मोतीलाल पाटील, सासरे मोतीलाल भोज पाटील, सासू सुंदराबाई मोतीलाल पाटील, भाची दर्शना रामदास पाटील, दिपक दशरथ पज्ञटील, दशरथ रतिलाल पाटील सर्व रा. मोहाडी ता.जि.धुळे, मोहन गंगाराम पाटील, छाया मोहन पाटील रा. धरणगाव, रामदास भाईदास पाटील, प्रतिभा रामदास पाटील रा. सुरत आणि सुषमा मोहन पाटील रा. मोहाडी ता.जि.धुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक रविंद्र पाटील करीत आहे.