जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उस्मानिया पार्क येथील माहेर असलेल्या विवाहितेला तिने घर बांधण्यासाठी माहेरुन पैसे आणावेत या कारणावरुन छळ करणाऱ्या पतीसह पाच जणांविरोधात बुधवार, २० जुलै रोजी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, उस्मानिया पार्क येथील सुरैय्याबी शेख वय ३५ यांचा एरंडोल येथील शेख रहिस शेख सलीम यांच्याशी विवाह झाला आहे. सुरैय्याबी यांनी घरबांधण्यासाठी माहेरुन १ लाख रुपये आणावेत तसेच मुलीच झाल्या या कारणावरुन तिचा पतीसह सासरच्यांनी २००७ ते २०२२ दरम्यान वेळावेळी शिवीगाळ तसेच मारहाण करत शारिरीक व मानसिक छळ केला. छळ असह्य झाल्याने सुरैय्याबी या माहेरी निघून आल्या. व याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन बुधवारी सुरैय्याबी हिचे पती शेख रहीस, शेख सलीम शेख, बैतुलबी शेख सलीम, शेख सहिद शेख सलीम, शेख सादीक शेख सलीम सर्व रा. मुल्लाबाळा परिसर, एरंडोल या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ललीत भदाणे हे करीत आहेत.