अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पैशांच्या वादातून अमळनेर शहरातील भाजी मंडई परिसरात राहणाऱ्या एका तरूणाला दोन जणांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जितेंद्र शिवाजी पवार (वय-३०) रा. धुपी ता. अमळनेर, हे आपल्या पत्नी कविता पवार याच्यासोबत वास्तव्याला आहे. उसाचे पैसे देण्याच्या कारणावरून पारोळा तालुक्यातील वसंत नगर येथी सुरेश सदू जाधव आणि अशोक सदू जाधव यांनी जितेंद्र पवार याच्या वाद झाला होता. दरम्यान, २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जितेंद्र पवार हा अमळनेर शहरात भाजीपाला घेण्यासाठी आला होता. त्यावेळी सुरेश जाधव व अशोक जाधव यांनी जितेंद्र पवार याचे अपहरण केले. त्यानंतर रात्री ११ वाजता जितेंद्र पवार यांच्या पत्नी कविता यांना फोन करून उसाचे पैसे देणे घेण्याच्या वादातनू अपहरण केले आहे असे सांगितले. त्यानुसार महिलेने सोमवारी २७ मार्च रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून दोघांविरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी सुरेश सदू जाधव आणि अशोक सदू जाधव दोन्ही रा. वसंत नगर, ता.अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रामकृष्ण कुमावत करीत आहे.